Nagpur news: CISF अधिकारी असल्याचे भासवून सायबर फसवणुकीचा प्रयत्न

डॉक्टरांची सतर्कता, सायबर सेलमध्ये तक्रार
Nagpur news:
Nagpur news:
Published on
Updated on

नागपूर नागपूरमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करीत एका ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञाची लाखों रुपयांचीची फसवणूक करण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे फसला.

मिळालेल्या माहितीनुसार ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ तसेच COMHAD (UK) चे कार्यकारी संचालक व भारतीय बालरोग अकादमीचे (IAP) माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय बोधनकर यांना सकाळी एक फोन कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला CISF कमांडंट असल्याचे सांगत CISF कर्मचाऱ्यांच्या सुमारे 90 मुलांची वैद्यकीय तपासणी करण्याची विनंती केली. देशाच्या सुरक्षेसाठी सेवा देणाऱ्या जवानांप्रती आदर व्यक्त करत डॉ. बोधनकर यांनी मानवीय भूमिकेतून ही तपासणी मोफत करण्यास सहमती दर्शवली. मात्र, संभाषणादरम्यान कॉल करणाऱ्याने अचानक 50 हजार रुपये आगाऊ रक्कम देण्याची मागणी करत QR कोड शेअर करण्यासाठी दबाव टाकला.

यानंतर दुसऱ्या व्यक्तीने व्हिडिओ कॉल करून स्वतःला “मेजर रावत” असल्याचे सांगितले आणि फोनमधील मॅनेज/सेटिंग ऑप्शनवर क्लिक करण्यास सांगितले. यामुळे संशय अधिक बळावला. फोन त्या क्रमांकाशी लिंक झाला असता संबंधित व्यक्ती डॉक्टरांच्या बँक खात्यातील सर्व रक्कम काढू शकली असती. हे लक्षात येताच सर्व प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात आली आणि संभाव्य फसवणूक टळली.

यानंतर सर्व संशयास्पद मोबाईल क्रमांक ब्लॉक करण्यात आले. स्क्रीनशॉट, बनावट ओळखपत्रांचे फोटो व मोबाईल नंबरसह सायबर क्राईम विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कॉलच्यावेळी उपस्थित असलेले नियोग थेरेपिस्ट,ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रवीण डबली यांनी संपूर्ण प्रकार लक्षपूर्वक पाहून हा सायबर फसवणुकीचा प्रयत्न असल्याचा इशारा दिला. त्यांच्या सतर्कतेमुळे कोणताही आर्थिक व्यवहार होण्याआधीच थांबवण्यात आला.

डॉ. उदय बोधनकर म्हणतात कठोर कारवाई व्हावी

डॉ. उदय बोधनकर म्हणाले, “सायबर भामटे आता लष्कर, पोलीस आणि शासकीय संस्थांची नावे वापरून लोकांच्या भावना हाताशी धरत आहेत. जागरूकता आणि सतर्कताच यावरचा प्रभावी उपाय आहे. आपण डिजिटल युगात प्रवेश करत आहोत, त्यामुळे सरकारने अशा मोबाईल क्रमांकांचा माग काढून कठोर कारवाई करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news