

नागपूर - अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीतून असंख्य रूग्णांना l व्याधीपासून मुक्त होण्यास मदत झाली आहे. 24 वर्षांपूर्वी मी स्वतः पाठदुखीने त्रस्त असताना या उपचार पद्धतीने मला तंदुरुस्त होता आले. या ज्ञानशाखेच्या विस्तारासाठी व याचे शैक्षणिक मार्ग वृद्धींगत व्हावेत, या दृष्टीने महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.अॅक्युपंक्चर उपचार पद्धती ही अनुभूतीची उपचार पद्धती आहे यावर भर दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंन्शन सेंटर येथे आयोजित नॅशनल कॉन्फरन्स ऑन अॅक्युपंक्चर अॅक्यूकॉन 2026 च्या उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी महाराष्ट्र काऊन्सील ऑफ अॅक्युपंक्चरचे डॉ. रूमी बेरामजी, इंडियन सोसायटी ऑफ मेडिकल अक्युपंक्चर या संस्थेचे अध्यक्ष डॉ. रमण कपूर यांच्यासह डॉ. नारायण नवले आणि डॉ. प्रदीप गुहा आदि मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रात ४ हजार ५०० पेक्षा अधिक नोंदणीकृत तज्ज्ञ अक्युप्रेशरची सेवा देत आहेत. यात साठ टक्के संख्या ही महिलांची असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे डॉ. रूमी बेरामजी यांनी यावेळी सांगितले.