

नागपूर : नक्षलवाद संविधान मानत नाही आणि भाजप संविधान नष्ट करायला निघाले आहे. या दोघांमध्ये हीच समानता असल्याचा आरोप छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते भूपेश बघेल यांनी केला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री झाल्यामुळे नैराश्यात आहेत. फडणवीस यांनी लाल हा नक्षली रंग असल्याचे वक्तव्य केले. मुळात लाल रंगापासून देवेंद्र फडणवीस यांना काय त्रास होतो. लाल रंग देवीच्या चुनरीचा, बजरंगबलीचा असून सूर्याचा उगवताना आणि मावळताना रंगही लाल असताना त्यांचा विरोध का,असा सवालही बघेल यांनी पत्रकार परिषदेत केला.
नागपूर विभागातील निवडणूक समन्वय जबाबदारी काँग्रेसने त्यांच्यावर दिली आहे. राहुल गांधींच्या संमेलनात दिला तो नोट पॅड होता, राहुल गांधी यांना भाषणाचे पॉइंटर लिहिण्यासाठी दिले होते. त्या रंगावर का जाता, पहिले हिरव्या रंगाचा त्रास होता, आता लाल रंगाचा त्रास आहे याकडे लक्ष वेधले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अवैध पद्धतीने बनलेले सरकार राज्यात आहे. कारण सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे सरकार अवैध असल्याचा ठपका ठेवला. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत संविधान संमेलनामुळे भाजप घाबरली आहे. भाजपने संविधान बदलण्याचे भाष्य केल्याने संविधान रक्षणासाठी पक्ष आणि अनेक संघटना सोबत आल्यात.(Maharashtra assembly poll)
राहुल गांधी हे सर्वसामान्यांना न्यायाबद्दल बोलत आहेत. महागाई, बेरोजगार वाढल्यावर बोलत आहेत. मुळात देशात,राज्यात भाजपच्या सरकारमुळे लोक त्रस्त झाले आहेत.एकंदरीत संविधान संमेलन नोट पॅडवर पुन्हा वाद विवाद होण्याची शक्यता आहे. उद्योजकांच्याच हातात सगळे न एकवटता सर्वांना समान संधी मिळावी ही काँग्रेसची भूमिका आहे. पंतप्रधान मोदी देशातील संपत्ती एकाच व्यक्तीच्या हातात देत आहेत. ईस्ट इंडिया कंपनीची भीती जनतेत आजही आहे.
महाविकास आघाडीने पंचसूत्री योजना आणली. महाविकास आघाडी सरकार लाडकी बहीण योजना बंद करतील असे भाजप जनतेत सांगत आहे. नक्षलवाद्यांनी जेवढं नुकसान काँग्रेस पक्षाचे केले तेवढं कुणाचेच केलेले नाही,धानाचे समर्थन मूल्य वाढवण्यात आले. सामान्य जनेतेला पैसे देण्यात काय दुःख, उदयोगपतीचे कर्ज माफ होते त्याचं काय ?छत्तीसगडमध्ये मंत्र्यासह अनेकजण गमावले आणि ते आम्हाला नक्षली म्हणत आहेत असा आरोप बघेल यांनी भाजपवर केला.
दरम्यान, सिंधीया यांचे पूर्वज आणि ईस्ट इंडिया कंपनीसोबत काय संबंध होते हे सगळ्यांना माहीत असल्याचे एका प्रश्नाचे उत्तरात सांगितले. आज आणीबाणीपेक्षा वाईट अवस्था आहे. लिहतो, बोलतो त्याला ईडीचा धाक दाखविला जातो, काँग्रेस नेत्यांवर बोलण्यापेक्षा गडकरी यांनी स्वतःविषयी बोलावे. उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यापेक्षा, शेतकरी,सर्वसामान्य लोकांना ताकद दिल्याने राज्याची तिजोरी खाली होत नाही. भाजप सरकार आल्यापासून 215 लाख कोटींचे कर्ज झाले, त्यावर कोणी बोलत नाही.(Maharashtra assembly poll)
शरद पवार यांच्या निवृत्तीबाबत छेडले असता, ते जेष्ठ नेते आहेत. त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला तरी ते महाविकास आघाडीचे नेते असून त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळत राहावे. विदर्भ, महाराष्ट्रात आम्ही दिलेल्या पाच गॅरंटीचा फायदा होईल असा दावा केला. भाजप नेते कंटेंगे- बटेंगे म्हणत आहेत. खरेतर देशात तोडण्याची नाही तर जोडण्याची चर्चा झाली पाहिजे यावर बघेल यांनी भर दिला.