

Minor Girl Found Dead Body Nagpur
नागपूर: नरसाळा घाटाच्या मागे एका चिमुकलीचा लचके तोडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी (दि.२७) सकाळी उघडकीस आली. प्राथमिक तपासात या चिमुकलीवर वन्यप्राण्याने हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या मुलीचे नाव अनुष्का मेढा असे आहे.
खुल्या जागेत सुमारे ८ ते ९ महिन्यांच्या मुलीचे हे अर्धवट पार्थिव आढळून आल्याने खळबळ उडाली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला असून शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हुडकेश्वर पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत. गेल्या काही दिवसात मोकाट कुत्र्यांच्या शोधात बिबट्या नागपुरातील पारडी, दिघोरी, हुडकेश्वर नरसाळा आदी शहरी भागांत आल्याच्या घटना घडल्या आहेत.