Nagpur Municipal Election Results| मनपा निकाल लागले, मिरवणुका झाल्या, नागपूरचा महापौर कोण होणार ?

Who will become the mayor of Nagpur| मुंबईसह राज्यभरातील महापालिकामधील महापौर पदाचे आरक्षण सोडत अद्याप निघालेली नसल्याची माहिती आहे
Nagpur Municipal Election Results| मनपा निकाल लागले, मिरवणुका झाल्या, नागपूरचा महापौर कोण होणार ?
Published on
Updated on

राजेंद्र उट्टलवार

नागपूर: महापालिका निवडणुकीचे निकाल लागले चौथ्यांदा भाजप, शिवसेना महायुतीची नागपुरात सत्ता येणार हे स्पष्ट झाले. नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विजयी मिरवणुकादेखील पार पडल्या. मात्र नागपूरचा नवा महापौर कोण, याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही.

मुंबईसह राज्यभरातील महापालिकामधील महापौर पदाचे आरक्षण सोडत अद्यापही निघालेली नाही. 2017 साली महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर 2026 अर्थात नऊ वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीसाठी यावेळी प्रचंड चुरस होती. 102 नगरसेवकांचे संख्याबळ असलेला भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. 34 नगरसेवकांची संख्या असलेला काँग्रेस विरोधी बाकावर असणार आहे. महापौरपदाचे आरक्षण निघाल्यानंतर ही निवडणूक होईल. 2019 साली खुल्या प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित होते. आता महानगर अध्यक्ष असलेले दयाशंकर तिवारी तर आमदार झालेले संदीप जोशी महापौर होते. 2005 मध्ये ओबीसी 2007 एसटी 2009 ओबीसी महिला, 2012 खुला प्रवर्ग 2014 ओबीसी, २०१७ खुला प्रवर्ग महिला असे आरक्षण होते. यामुळे यावेळी ते अनु जातीसाठी राखीव असण्याची शक्यता अधिक वर्तविली जात आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात नवे नगरसेवक निवडून आले आहेत.

अर्थातच नागपूरचा महापौर ज्येष्ठ की नवा चेहरा अशी इच्छुकांमध्ये चुरस वाढली आहे. 151 सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत 78 महिला आणि 73 पुरुषांचा समावेश आहे. भाजपकडून 54, आणि काँग्रेसकडून 15 महिला नगरसेविका महापालिकेत दाखल झाले आहेत. मुस्लिम लीगच्या दोन तर राष्ट्रवादी अजितदादा आणि बसपा या दोन्ही पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली.त्यादेखील महिला उमेदवार आहेत याशिवाय यावेळी 10 स्वीकृत सदस्य मनपात असणार आहेत. भाजपला 7, काँग्रेस 2 आणि इतर 1 असे सदस्य असतील. यासाठीही लॉबिंग सुरू झाले आहे.

अनेकाना बंडखोरीचा फटका बसला. गेल्यावेळी ही संख्या 5 नगरसेवक होती. वैशिष्ट्यपूर्ण निकालांचा विचार करता माजी महापौर मायाताई इवनाते आणि माजी उपमहापौर किशोर कुमेरिया दोघेही पाचव्यांदा नगरसेवक झाले आहेत. भाजपचे बाल्या बोरकर चौथ्यांदा तर नीता ठाकरे, दिव्या धुरडे, बंडू राऊत, संदीप गवई, संजय बालपांडे, विद्या कन्हेरे तिसऱ्यांदा महापालिकेत निवडून आले आहेत. बंटी कुकडे, पिंटू झलके, दिलीप दिवे, अश्विनी जिचकार दुसऱ्यांदा तर काँग्रेस कडून दीपक पटेल संजय महाकाळकर हे दोन ज्येष्ठ नगरसेवक विजयी झाले आहेत. यापैकी एक विरोधी पक्ष नेता होऊ शकतो.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष व गेल्यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते असलेले दुनेश्वर पेठे यांचा पराभव झाल्याने त्यांनी पक्षाच्या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शप गटाला खाते देखील उघडता आले नाही. अजित पवार गटातून एकमेव आभा पांडे विजयी झालेक्या आहेत. शिवसेना शिंदे गटाला एक जागा मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news