Nagpur Municipal News | नागपूर महापालिकेत पहिलाचा प्रयोग : स्थायी, परिवहन समितीसह झोन सभापतीपदी महिलांना संधी

महानगर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी भाजप कार्यालयात या विषयाची माहिती पत्र परिषदेत दिली
Nagpur Municipal Election
Nagpur Municipal ElectionPudhari
Published on
Updated on

NMC Committee Chairperson

नागपूर: नागपूर महापालिकेमध्ये सत्तारूढ भाजपच्या वतीने यावर्षी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, परिवहन आणि इतर समित्या तसेच दहा झोनचे सभापती असे संपूर्ण 100 टक्के महिलाराज बघायला मिळणार आहे. देशात या प्रकारची नागपूर ही पहिलीच मनपा असणार आहे.

महानगर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी भाजप कार्यालयात आज या विषयाची माहिती पत्र परिषदेत दिली. दरम्यान, विरोधकांमध्ये काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी यांनी देखील आपल्या वाट्याच्या स्थायी समिती सदस्य निवडताना महिला प्रतिनिधींना संधी द्यावी जेणेकरून मनपात 100 टक्के महिलाराज बघायला मिळू शकेल, यासाठी आम्ही त्यांना विनंती केली असेही तिवारी यांनी स्पष्ट केले.

Nagpur Municipal Election
HSC Paper Leak Nagpur Update | बारावी पेपरफुटीचा महाघोटाळा: 2 जणांना पोलिस कोठडी; अनेक शिक्षक आणि विद्यार्थी पोलिसांच्या रडारवर!

नागपूर महापालिकेची तिजोरी कुणाच्या ताब्यात जाणार हे मंगळवारी (दि. 24) स्पष्ट होणार असल्याचे सांगितले. स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड झाल्यानंतर यातूनच अध्यक्षपदाची निवड केली जाणार असून हे सर्व महिला पदाधिकारी असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेत प्रवेश करताना 50 टक्के महिलांना संधी याविषयीचे सूतोवाच केले तोच कित्ता गिरवत नागपूर भाजप कोर कमिटी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या सर्वांच्या मार्गदर्शनात आम्ही सर्व समित्यांवर यावर्षी महिलांना संधी देण्याचा निर्णय एकमुखाने घेतला.

या माध्यमातून मातृ शक्तीचा जागर बघायला मिळणार आहे. दहा विषय समित्यांवर तर दहा झोन सभापती देखील महिलाच असणार आहेत. एकंदरीत नागपूर मनपा महिलाच चालविणार आहेत. काँग्रेसला चार स्थायी समिती सदस्य मिळणार असून बहुमत एमआयएम, मुस्लिम लीग यांच्या बहुजन विकास आघाडीने देखील आपल्या वाट्याच्या सदस्यपदी महिलांनाच संधी द्यावी अशी विनंती आपण केली असल्याचे तिवारी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news