नागपूर : संभाजी महाराजांशी तुलना ही विकृती ; मुधोजी राजे भोसले संतापले

Mudhoji Raje Bhosale Demand : आमदार अनिल परब यांचे निलंबन करण्याची केली मागणी
Mudhoji Raje statement
मुधोजी राजे भोसलेfile photo
Published on
Updated on

नागपूर : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या अनुषंगाने राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना शिवसेना आमदार अनिल परब यांनी 'छावा बघा, मला बघा संभाजी महाराजांचा वारसा कोण चालवत आसेल तर तो मी..! असे वक्तव्य केले. ते पुढे असेही म्हणाले की छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचा धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ करण्यात आला. तसाच छळ मी पक्ष बदलावा म्हणून करण्यात आला. या वक्तव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीसाठी अनिल परब यांचे निलंबन करावे अशी मागणी नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनी केली आहे.

स्वत:ची तुलना छत्रपती संभाजी महाराजांसोबत करता ही तुमची विकृती आहे. तुम्ही महाराष्ट्राची क्षमा मागावी. तुमच्या या वक्तव्याचा मी नागपूर भोसले राज घराण्याचा वंशज या नात्याने तीव्र शब्दात निषेध करतो असेही राजे मुधोजी भोसले यांनी म्हटले असून तातडीने त्यांना निलंबित करण्याची विनंती विधानपरिषद सभापती यांच्याकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news