Nagpur News | मायलेकीचा मृत्यू उष्माघाताने की भूकबळी?

गाडगेनगर येथे एका घरात कुजलेल्या स्थितीत आढळले आई मुलीचे मृतदेह
Nagpur News | मायलेकीचा मृत्यू उष्माघाताने की भूकबळी?
Nagpur News | मायलेकीचा मृत्यू उष्माघाताने की भूकबळी?
Published on
Updated on

नागपूर - नंदनवन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गाडगेनगर येथे एका घरात कुजलेल्या स्थितीत मायलेकीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आता हे उष्माघाताचे मृत्यू की भूकबळी याविषयीचे सत्य शव विच्छेदन अहवालातून समोर येणार आहे.

तुळसाबाई माधवराव वाढई (वय ६५) आणि संगीता माधवराव वाढई (वय ४८), अशी या दोन मृतकांची नावे आहेत. संगीता या गतिमंद होत्या. तुळसाबाई यांचा मुलगा गुजरातमधील भरूच येथे नोकरीला आहे. तुळसाबाई यांनी २ मे रोजी मुलाच्या मोबाइलवर फोन लावून कुलर नादुरुस्त असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांचा मुलासोबत संपर्क झाला नाही.

मंगळवारी सायंकाळी ५ वाजता मुलाने तुळसाबाई यांच्या मोबाइलवर संपर्क साधलाअसता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, मुलाने जवळच्या नातेवाइकाला घरी जाण्यास सांगितले. नातेवाइक घरी आल्यावर त्याला दुर्गंधी यायला लागली. त्याने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. माहिती मिळताच नंदनवन पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी दरवाजा तोडला असता दोघींचेही कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळले. पंचनामा करून पोलिसांनी दोघींचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलकडे रवाना केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news