

नागपूर : आज शुक्रवारी सकाळी रहाटे कॉलनी मेट्रो स्थानकावर आग लागल्यामुळे सुमारे ५० मिनिटांसाठी मेट्रोची सेवा विस्कळीत झाली यासंदर्भात मेट्रो व्यवस्थापनानेही दुजोरा दिला आहे. अचानक मेट्रोची सेवा तासभरासाठी विस्कळीत झाल्याने प्रवाशांमध्ये चिंता पसरली.
अनेक प्रवाशांची यामुळे गैरसोय झाली. मेट्रोने दिलेल्या माहितीनुसार आज ही आग सकाळी ११.१३ वाजता छतावरील सौर पॅनलमध्ये शॉर्टसर्किटमुळे लागली होती आणि ती लवकरच नियंत्रणात आणण्यात आली. मेट्रो सेवा दुपारी १२.२० वाजता पूर्ववत करण्यात आली. दरम्यान, महामेट्रो नागपूरने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.