Nagpur News | नागपूर महानगरपालिकेत 'महिला राज'...! नीता ठाकरे होणार 'महापौर', आज अर्ज भरणार

Nagpur News | नागपूर महानगरपालिकेत 'महिला राज'...! नीता ठाकरे होणार 'महापौर', आज अर्ज भरणार
Published on
Updated on

नागपूर : उपराजधानी नागपूरच्या नव्या महापौर भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका नीता ठाकरे असणार आहेत. आज 2 फेब्रुवारी रोजी त्या महापालिकेत जाऊन नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. 6 फेब्रुवारी रोजी सुरेश भट सभागृहात महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे.151 सदस्यीय महापालिकेत 102 सदस्य निवडून आलेला भाजप सर्वात मोठा, बहुमतातील पक्ष आहे.

काँग्रेसकडे 34 नगरसेवक आहेत. गेले काही दिवस यासंदर्भात आणि अनिश्चितता कायम होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, संजय भेंडे,आमदार प्रवीण दटके, मोहन मते, कृष्णा खोपडे आदींनी याबाबतीत बैठकीत शिक्कामोर्तब केले. स्थायी समिती अध्यक्षपदाची धुरा शिवानी दाणी यांच्याकडे तर उपमहापौर म्हणून संजय बालपांडे यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अलीकडेच सत्तापक्ष नेता पदी ज्येष्ठ नगरसेवक बाल्या(नरेंद्र)बोरकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नवनिर्वाचित सदस्यांची पहिली विशेष सभा शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत महापौर(महिला), उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार असून, १६ स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. महापौर, उपमहापौर पदासाठी आज सोमवारी सिव्हील लाईन्स येथील मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृह येथे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत. काँग्रेसकडून देखील उमेदवार दिले जाणार आहेत.

विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी महापौर, उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. याकरिता पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निवडणूक प्रक्रियेची सूचना निर्गमित केली आहे. बॉक्स ... अशी होणार निवड प्रक्रिया शुक्रवारी विशेष सभेला सुरुवात झाल्यानंतर पीठासीन अधिकारी उमेदवारी अर्जांची छाननी करणार आहेत. त्यानंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. नवनिर्वाचित सदस्यांनी सभेला येताना निवडणूक विभागामार्फत देण्यात आलेले सूचनापत्र व निवडून आल्याचे प्रमाणपत्र (झेरॉक्स प्रत) सोबत आणावेत असे आवाहन मनपाच्या निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news