Nagpur mayor news | आज ठरणार 'महापौर' ?, 92 नगरसेवक प्रथमच मनपात, तरुण रक्ताला संधी ?

अनुसूचित जातीचे महापौर पद यावेळी राखीव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे
Nagpur mayor news | आज ठरणार 'महापौर' ?, 92 नगरसेवक प्रथमच मनपात, तरुण रक्ताला संधी ?
Published on
Updated on

राजेंद्र उट्टलवार

नागपूर : महापालिका निवडणुकीत सर्वाधिक 102 जागा जिंकत मोठा पक्ष असलेल्या भाजपने सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत. आज गुरुवारी (दि.22) नागपूरसह राज्यातील 29 महापालिकांसाठी महापौर पदाची सोडत मुंबईत निघणार आहे. विशेष म्हणजे 92 नगरसेवक हे पहिल्यांदाच महापालिकेत निवडून आले असल्याने यंदा तरुण रक्ताला महापौरपदी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

खरेतर परंपरेनुसार निवडणुकीपूर्वी ही सोडत काढली जाते. मात्र यावेळी ती निवडणूकीनंतर होत आहे. सात दिवसाच्या आत महापौरपदाची निवड प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. 9 वर्षानंतर झालेल्या महापालिका निवडणुकांचे निकालानंतर आता महापौर कोण, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. गेले चार वर्षे प्रशासकाच्या माध्यमातून मनपाचा कारभार सुरू होता. माजी नगरसेवक आणि लोकांच्या तक्रारी कायम होत्या. 2017 ते 2022 या काळात ओबीसी महिला आणि खुला प्रवर्ग असे महापौरपदाचे आरक्षण होते. अडीच वर्षे नंदा जिचकार त्यानंतर प्रत्येकी सव्वा, सव्वा वर्ष संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी यांच्याकडे महापौर पद होते.

नवीन रक्ताला मिळणार संधी?

यावेळी नव्या रक्ताला वाव मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरक्षण खूप दिवसात न मिळाल्याने अनुसूचित जातीचे महापौर पद यावेळी राखीव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे इच्छुकांकडून मोर्चेबांधणी देखील सुरू झाली आहे. नागपूर मनपात 151 पैकी भाजपकडे 102, शिवसेना शिंदे गट 1, काँग्रेस 34, शिवसेना उबाठा 2, बसपा 1, एम आय एम 6 आणि मुस्लिम लीग 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1 असे हे मनपात पक्षीय संख्याबळ आहे. 10 स्वीकृत सदस्य होणार असल्याने नाराज पदाधिकाऱ्यांना पुन्हा संधी मिळू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news