Nagpur news | नागपूरचा महापौर,उपमहापौर 6 फेब्रुवारीला ठरणार,पुढारीचे वृत्त खरे ठरले!

विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या चारही महापालिकेतील महापौर पदासाठी निवड प्रक्रियेला वेग
Chandrapur Muncipal Corporation
Chandrapur Muncipal CorporationPudhari
Published on
Updated on

नागपूर: उपराजधानी नागपूरचा भाजपचा नवा महापौर आणि उपमहापौर कोण असणार हे आता येत्या 6 फेब्रुवारी रोजी निश्चित होणार आहे. हा मनपाच्या इतिहासातील 54 वा आणि यावेळी खुला प्रवर्ग महिला असे आरक्षण निघाल्यामुळे आठवा महिला महापौर असणार आहे.

रेशीमबाग स्थित कविवर्य सुरेश भट सभागृह येथे सकाळी 11 वाजता यासाठी विशेष सभा बोलावण्यात आली आहे. विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बीदरी यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांना यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे. यावेळी नवनिर्वाचित 102 भाजप नगरसेवकांमधून महापौर, उपमहापौर निवडीचा निर्णय होणार आहे. त्याच दिवशी या संदर्भातील नावाची घोषणा पक्षाकडून केली जाणार आहे. दरम्यान ,34 सदस्य असलेल्या काँग्रेसने संजय महाकाळकर यांना आपला गटनेता निवडले आहे.

काँग्रेसने महाविकास आघाडी अशी नोंदणी विभागीय आयुक्त कार्यालयात शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, अभिजीत वंजारी यांच्या माध्यमातून केली आहे. भाजप व इतर पक्षांची नोंदणी 16 जानेवारीला निकाल लागलेला असताना अद्यापही व्हायची आहे. बहुमतात असलेल्या भाजपला मुंबई तसेच नागपुरात देखील महापौर निवडीसाठी इतका उशीर का, असा प्रश्न पहिले काही दिवस सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होत होता. आता या चर्चेला पूर्णविराम लागणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात महापौर निवड होणार असल्याचे वृत्त यापूर्वीच 'पुढारी'ने दिले होते. मध्यंतरीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात विदेशी गुंतवणुकीसाठी दावोस दौऱ्यावर होते. आता ते परतल्यानंतर राज्यभरात राजकीय बेरीज जोरात असून विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या चारही महापालिकेतील महापौर पदासाठी निवड प्रक्रियेला वेग आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news