Ladka Bhav Protest | लाडक्या भावांचा 25 ऑगस्टला नागपुरात चक्काजाम!

Youth Trainee Protest | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी लाडक्या भावांची राज्य सरकारने केलेल्या फसवणुकीच्या निषेधार्थ नागपूर येथे संविधान चौकात करणार आंदोलन...
Ladka Bhav Protest
बालाजी पाटील चाकूरकर(Pudhari File Photo)
Published on
Updated on

नागपूर : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी लाडक्या भावांची राज्य सरकारने केलेल्या फसवणुकीच्या निषेधार्थ नागपूर येथे संविधान चौकात 25 ऑगस्ट रोजी 25 हजार लाडक्या भावांचा चक्काजाम (रस्ता रोको )आंदोलन केले जाणार आहे. हा केवळ निवडणूक जुमला होता की काय असा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना पडला असल्याचा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला.

विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण खुश केल्यानंतर लाडक्या भावाचे काय हा प्रश्न जेव्हा उपस्थित केला गेला तेव्हा लाडक्या भावालाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही अशा प्रकारची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आणि मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना घोषित करून दहा लाख तरुणांना प्रतिवर्षी कौशल्य विभागांतर्गत शासकीय आस्थापनेमध्ये प्रशिक्षण देऊन त्याच आस्थापनेमध्ये कायम करू अशा प्रकारची घोषणा केली. या घोषणेनंतर राज्यातील इतर क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या तरुणांनी आपली नोकरी सोडून शासकीय नोकरी मिळत आहे या आशेपोटी राज्यातील विविध आस्थापनामध्ये एक लाख 34 हजार तरुणांनी आवेदन केले आणि प्रशिक्षण सहा अधिक पाच एकूण 11 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले.

Ladka Bhav Protest
Nagpur News | कामठी खैरी जलाशयाच्या कालव्यात आईसह पाच वर्षांचा मुलगा बुडाला; शोधकार्य सुरू

राज्य सरकार या या लाडक्या भावाला प्रशिक्षणार्थ्यांना 11 महिन्याचे प्रमाणपत्र देणार आहे हे प्रमाणपत्र घेऊन कुठे जायचं हे मात्र सांगत नाही. कारण या प्रमाणपत्राला कुठेही व्हॅल्यू नाही. शासकीय आस्थापनेमध्ये काम केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना बाहेर कोणीही नोकरी देणार नाही. मुंबई येथील आझाद मैदानामध्ये चार महिने विविध प्रकारे आंदोलन झाले पण राज्य सरकार याकडे लक्ष देत नाही. याचा निषेध म्हणून दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता नागपूर येथे संविधान चौकामध्ये चक्काजाम आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर, अनुप चव्हाण,प्रकाश साबळे हे करणार आहेत.

Ladka Bhav Protest
Nagpur News| चंद्रशेखर बावनकुळेंच्या नावाने पोलिसांंना दमदाटी; तिघांवर गुन्हा

आंदोलनातील मागण्या...

1)एक लाख 34 हजार प्रशिक्षणार्थ्यांना नियमित कायमस्वरूपी रोजगार.

2)प्रशिक्षणार्थ्यांना मानधनात दुप्पट वाढ.

3) ज्या दिवशी प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी जॉईन झाला त्या दिवशीपासून वयोमर्यादा मोजदाद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news