

नागपूर : जबलपूर महामार्गावर आज मंगळवारी सायंकाळी झालेल्या ट्रॅव्हल्स, ट्रक अपघातात ट्रॅव्हल्स चालकाचा मृत्यू झाला, तर चार प्रवासी जखमी झाले. पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
जबलपूर हायवेवर हिंदुस्तान सावजी ढाब्याचे समोर ही घटना घडली. भरधाव ट्रॅव्हल्स क्रमांक CG 04 QK 9936 चा चालक मोहम्मद इमरान वर्ल्ड मोहम्मद सामी वय 37 वर्ष रा तेलंगणा याचा अपघातात मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्सच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजी पणाने चालवून समोर जाणाऱ्या ट्रकला मागून धडक दिली. त्यामध्ये ट्रॅव्हल्स चालक हा घटनास्थळी मरण पावला व दोघे गंभीर जखमी झाले. इतर 4 प्रवासी हे किरकोळ जखमी झाले आहेत.
पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे ट्रॅव्हल्सच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातानंतर वाहनांच्या रांगा लागल्या. अपघात ग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आली व मार्ग मोकळा करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापूरे पोलीस ठाणे हुडकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.