12th Exam Result 2025 : बारावी परीक्षा नागपूर विभागाच्या निकालात घसरण, राज्यात 8 व्या क्रमांकावर

Nagpur division HSC result: गत दोन वर्षाच्या तुलनेत १.६ टक्क्यांनी घट
12th Exam Result
कोकणातली पोरं हुशार...बारावीच्या परीक्षेत राज्यात कोकण बोर्ड अव्वल, ९६.७४ टक्के निकालFile Photo
Published on
Updated on

Nagpur division HSC result drop

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागाच्या इयत्ता 12 वीच्या निकालात गत दोन वर्षाच्या तुलनेत १.६ टक्क्यांनी घट झाली. राज्यात नागपूर विभाग सलग तिसऱ्या वर्षीही ९२.१२ टक्क्यांसह आठव्या क्रमांकावरच आहे. सर्वच विभागांमध्ये मुलींची टक्केवारी ही मुलांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

यावर्षी कॉपीमुक्त अभियानाचा निकालावर मोठा परिणाम दिसून येतो. विभागात कॉपी करणाऱ्यांची संख्या कमी होती. निकालात यामुळे काहीशी घट झाल्याची माहिती विभागीय अध्यक्ष चिंतामन वंजारी यांनी दिली. २०२२-२३ मध्ये नागपूर विभागाचा निकाल ९०.३५ टक्के, तर २०२३-२४ मध्ये ९२.१२ इतका होता होता. यात आता १.६ टक्क्यांनी घट झाली असून यंदा तो ९०.५२ टक्के झाला आहे.

12th Exam Result
Amravati News : 22 वर्षीय महिला कुस्तीपटूचा हार्ट ॲटॅकने मृत्यू! प्राप्ती विघ्नेचा जाण्याने अमरावती क्रीडा क्ष्रेत्रावर शोककळा

यावर्षी ११ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. यामध्ये नागपूर विभागातून १ लाख ५२ हजार ४६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १ लाख ५१ हजार ११६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ३६ हजार ८०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ९०.५२ इतकी आहे. करोना काळात नागपूर विभागाच्या निकालाची टक्केवारी ही ९७ टक्क्यांपर्यंत गेली होती. मात्र, तीन वर्षांपासून या सवलती बंद होताच निकालात घसरण झाली आहे.

नागपूर विभागनिहाय विचार केल्यास गोंदिया जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९४.४ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.९६ टक्के तर सर्वात कमी कला शाखेचा ८९.०५ टक्के निकाल आहे. नागपूर विभागाच्या निकालात २०२३-२४ मध्ये मुलांची टक्केवारी ८९.८५ टक्के होती ती यंदा ८७.४१ टक्के झाली आहे. तर मुलींची टक्केवारी २०२३-२४ मध्ये ९४.४६ इतकी होती. यंदा ती ९३.७६ टक्के आहे. दर मागील वर्षीप्रमाणे गोंदिया जिल्हा ९४.०४ टक्क्यांनी अव्वल ठरला आहे. तर गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ८१.७७ टक्यांसह सर्वात कमी आहे.

विभागाची स्थिती

एकूण नोंदणी- १,५२,०४६

परीक्षा देणारे विद्यार्थी- १,५१,११६

उत्तीर्ण विद्यार्थी – १,३६,८०५

एकूण टक्केवारी – ९०.५२

गोंदिया – ९४.०४

गडचिरोली – ८९.१७

भंडारा – ८७.५८

चंद्रपूर – ८९.१७

नागपूर – ९३.४०

वर्धा – ८९.४०

शाखानिहाय निकाल

विज्ञान- ९७.९६

वाणिज्य – ९०.०२

कला – ७९.०५

एमसीव्हीसी – ८२.८१

आयटी – 81.44 टक्के

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news