Nagpur Heatwave | नागपुरात 24 तासात तिघांचा उष्माघाताने मृत्यू ?

विदर्भाने गाठला तापमानाचा पारा ४३ ते ४६ अंशांवर : मृत्यूंचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार
Nagpur Heatwave
Nagpur Heatwave | नागपुरात 24 तासात तिघांचा उष्माघाताने मृत्यू ?
Published on
Updated on

नागपूर - एकीकडे ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाच्या सरींनी उकाडा वाढविला असताना नागपूर,वर्धा येथे उन्हाचा चांगलाच कहर अनुभवास येत आहे. गेल्या २४ तासांत तीन अज्ञात इसम बेशुद्धावस्थेत आढळले. उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने उष्माघाताने ते दगावल्याची शक्यता आहे.

विदर्भात तापमान ४३ ते ४६ अंशांवर आहे. मुस्लिम कब्रस्तानाजवळ सायंकाळी 45 ते 50 वर्षाचा इसम बेशुद्ध आढळला.याशिवाय धंतोली हद्दीत जनता चौक ते पंचशील चौकदरम्यान शहीद गोवारी उड्डाणपुलाखाली सायंकाळी सातच्या सुमारास वाजता ३५ ते ४० वर्षीय पुरुष आढळला. तसेच सक्करदरा परिसरातील हॅप्पीनेस फॉर्नर हॉटेलसमोर सायंकाळी ६.१० वाजता ६५ ते ७० वर्षीय वृद्ध बेशुद्धावस्थेत मिळून आला. तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या मृत्यूंचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. हवामान विभागाने आज, शनिवारपासून नागपूरसह विदर्भातील काही भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून त्यामुळे कमाल तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी शक्यतो उन्हात फिरणे टाळा, पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news