

नागपूर : आज उपराजधानी नागपूरने या उन्हाळ्यातील सर्वाधिक 44.7 अंश सेल्सियस तापमानाची नोंद केली. यापूर्वी शुक्रवारी अकोल्यात पारा 44.3 अंशांवर होता.
आज नागपूरने अकोल्याला मागे टाकले. दोन तीन दिवस ढगाळ वातावरण असल्याने पारा 36 अंश पर्यंत खाली घसरला होता. मात्र, शुक्रवारी पुन्हा तापमान वाढले. शनिवारी राज्यात सर्वाधिक तापलेल्या जिल्ह्यात नागपूरचा समावेश असून 44.7 अंश तापमानाची नोंद झाली.
मागील काही दिवसांपासून सातत्याने तापत असलेल्या अकोला जिल्ह्याला मागे टाकले, अकोल्यात 44.3 अंश तापमानाची नोंद झाली.
आज शनिवारी नागपूर - 44.7 अकोला - 44.3,चंद्रपूर - 44 वर्धा -44,अमरावती - 43.8, ब्रह्मपुरी - 43.6,यवतमाळ 43.5,गडचिरोली 42.2 याप्रमाणे तापमान होते. विदर्भातील अन्य जिल्ह्यातील तापमान 40 अंशावर नोंदवले गेले.