Nagpur Graduate Constituency Election Result : नागपूर पदवीधरमधील अटीतटीच्‍या लढतीत काँग्रेसचे अभिजित वंजारी यांची बाजी

भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा पराभव
Nagpur Graduate Constituency Election Result : नागपूर पदवीधरमधील अटीतटीच्‍या लढतीत काँग्रेसचे अभिजित वंजारी यांची बाजी
Published on: 
Updated on: 

नागपूर : राज्यातील विधान परिषद निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजय मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीच्या मतांवर त्यांनी पहिल्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना मागे टाकत ही निवडणूक जिंकली.

या निवडणुकीत सुरुवातीपासूनच दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीचा आणि चुरशीचा सामना पाहायला मिळाला. पहिल्या फेरीत भाजपचे सुधाकर कोहळे यांनी आघाडी मिळवली होती, मात्र आवश्यक कोटा पूर्ण न झाल्यामुळे दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली. दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या फेऱ्यांमध्ये अभिजित वंजारी यांनी मुसंडी मारत कोहळेंवर मात केली आणि अखेर विजयावर शिक्कामोर्तब केले.

राज्यात झालेल्या पाच जागांच्या अत्यंत चुरशीच्या विधान परिषद निवडणुकीत ‘मविआ’ने ३, तर महायुतीने २ जागा जिंकल्‍या. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप, तर अमरावती शिक्षक मतदारसंघात एकनाथ शिंदे शिवसेना उमेदवारांनी विजय मिळवला. पुणे पदवीधर मतदारसंघात आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्‍या उमेदवारांची सरशी झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news