Nagpur News : नागपूर पदवीधर मतदारसंघ : एकाच दिवशी २४ अर्ज दाखल

एकूण अर्जांची संख्या ३० वर
Nagpur Graduate Constituency Election 2026
Published on: 
Updated on: 

नागपूर : नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज १८ उमेदवारांनी २४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. त्यामुळे आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण अर्जांची संख्या ३० वर पोहोचली आहे. उद्या, ६ ऑक्टोबर हा नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

आज शिवाजी सोनसरे (अपक्ष), अभिजित वंजारी (इंडियन नॅशनल काँग्रेस), ॲड. प्रदीप सोमकुवर (अपक्ष), सुधाकर कोहळे (भारतीय जनता पार्टी), सिद्धार्थ निकोसे (बळीराजा पार्टी), उत्तमप्रकाश शहारे (अपक्ष), भाजपचे बंडखोर अनिल सोले (अपक्ष), महाविकास आघाडीची चिंता वाढवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नितेश कराळे (अपक्ष), अशोक लांजेवार (अपक्ष), विनायक अवचट (अपक्ष), गजानन लोखंडे (अपक्ष), राजेंद्र आत्राम (अपक्ष), मंजिल गेडाम (अपक्ष), रमण सेनाड (अपक्ष), प्रमोद गुरपुडे (अपक्ष), नरेंद्र पाटील (अपक्ष), रामराव चव्हाण (जय विदर्भ पार्टी) आणि जगदीश वाडीभस्मे (अपक्ष) यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

यापैकी शिवाजी सोनसरे, अभिजित वंजारी, सुधाकर कोहळे, सिद्धार्थ निकोसे, अनिल सोले आणि मंजिल गेडाम यांनी प्रत्येकी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

दाखल अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर रोजी होणार असून, अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ९ ऑक्टोबरपर्यंत आहे. मतदान २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत पार पडेल. मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी होणार असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news