LPG Crisis Nagpur | नागपुरात गॅस एजन्सीसमोर लागल्या ग्राहकांच्या रांगा, पेट्रोल पंप चालकांना नो क्रेडिट

नागपुरातील खारा समूहाच्या कॉन्फिडन्स, गो गॅस कंपनीची दोन जहाजे इराणमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून अडकून
LPG supply Nagpur
गॅस कंपन्यांच्या वितरकांकडे ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत.Pudhari
Published on
Updated on

LPG supply Nagpur

नागपूर : आखाती युद्ध सुरू झाल्यापासून पेट्रोलियम पदार्थांचा तुटवडा वाढतच चालला आहे. खासगी गॅस कंपन्यांमधील एक मोठे नाव असलेल्या नागपुरातील खारा समूहाच्या कॉन्फिडन्स, गो गॅस कंपनीची दोन जहाजे इराणमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून अडकून पडली आहेत. एक जहाज नुकतेच रत्नागिरीला पोहोचले.

शहर व जिल्ह्यातील भारत, एचपी, इंडियन अशा प्रमुख शासकीय गॅस कंपन्यांच्या वितरकांकडे ग्राहकांच्या रांगा पहायला मिळत आहे. दरम्यान, शहरातील गॅस सिलिंडरच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांनी नागपूरमधील गॅस एजन्सींना अतिरिक्त सिलिंडरचा पुरवठा सुरू केला आहे. यासाठी नेहमीपेक्षा जादा ट्रक पाठवून सिलिंडरची उपलब्धता वाढविण्यात आली आहे.

LPG supply Nagpur
Nagpur Crime News | नागपुरात खळबळ! खैरी पुलाजवळ आढळला कुजलेला मृतदेह; घातपाताचा दाट संशय

देशभरातील पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांच्या डिलर्सना दिली जाणारी उधारी तेल कंपन्यांनी तत्काळ प्रभावाने बंद केली आहे. त्यामुळे आता पेट्रोल पंप चालकांना इंधन खरेदी करण्यासाठी आगाऊ पैसे भरावे लागणार आहेत. यापूर्वी डिलर्सना ठरावीक कालावधीसाठी उधारीवर पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादने दिली जात होती. मात्र आता ही उधारीची सुविधा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे डिलर्सना आधी पैसे भरूनच इंधन घ्यावे लागणार आहे.

या निर्णयामुळे अनेक पेट्रोल पंप चालकांवर आर्थिक ताण पडणार असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी अचानक असा निर्णय घेऊ नये यासाठी शासनाकडे आग्रह धरला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news