Nagpur Crime | नागपुरात खळबळ; आजीला मारहाण करणाऱ्या भावाला शोधताना झालेल्या हल्ल्यात लहान भाऊ ठार

गणेशपेठ परिसरात झालेल्या हत्याकांडात भाऊ अटकेत, तीन आरोपींचा शोध सुरू
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

Nagpur Brother Kills Brother

नागपूर : नागपूर गणेशपेठ परिसरात झालेल्या हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. दारूच्या नशेत आजीला मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाचा शोध घेण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अक्षय प्रकाश शेट्टे याचा मृत्यू झाला असून, त्याचे दोन मित्र जखमी झाले आहेत. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी मृताचा भाऊ मयूर शेट्टे याला अटक केली असून, अन्य तीन आरोपींचा शोध सुरू आहे.

मृत अक्षय शेट्टे हा कोतवाली परिसरातील शिवाजी पुतळा येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षयचा मोठा भाऊ मयूर शेट्टे हा दारूच्या नशेत घरी येऊन आजीला मारहाण करत होता. त्यामुळे अक्षय आपल्या मित्रांसह मयूरचा शोध घेत त्याला समजावण्यासाठी गेला होता.

Crime News
Nagpur crime news: नागपूर RTOचा दलाल हिंगोली एसीबीच्या जाळ्यात, वाहतूकदारकडून घेतली लाच

मयूर न सापडल्याने त्याच्या तीन मित्रांसोबत अक्षय व त्याच्या साथीदारांची बाचाबाची झाली. त्यानंतर अक्षय, आकाश पटले आणि अंकित चव्हाण हे अशोक चौकातून शिवाजी पुतळ्याकडे दुचाकीने जात असताना मोरघडे होमिओपॅथी क्लिनिकसमोर त्यांच्या दुचाकीला मागून मोपेडने धडक देण्यात आली.

धडक दिल्यानंतर रितेश उर्फ सोनू डेंगे, अमोल उर्फ भुऱ्या खुरसोड आणि अर्पित बुधे यांनी तिघांवर हल्ला केला. आकाश आणि अंकित यांना मारहाण करण्यात आली, तर अक्षयवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षयला त्याच्या मित्रांसह मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी सकाळी उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Crime News
Nagpur Crime : फरार आरोपीचा पोलिसांच्या ताब्यात असताना विषप्राशनाने मृत्यू

या घटनेनंतर गणेशपेठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून अक्षयचा भाऊ मयूर शेट्टे याला अटक केली आहे. तर रितेश डेंगे, अमोल खुरसोड आणि अर्पित बुधे या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. हत्येच्या या घटनेमागील नेमके कारण आणि आरोपींची भूमिका याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news