हृदयद्रावक : पंजाबमधून मामाच्या लग्नाला आलेल्या चिमुकलीचा बसच्या धडकेत मृत्यू

गणेशपेठ मॉडेल मिलजवळ जमावाने बस रोखली
 Nagpur  Girl Death
नागपुरात बसने धडक दिल्याने 6 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. Pudhari News Network

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : गणेशपेठ मॉडेल मिलजवळ आज ( दि. ११) दुपारी शहर बसने धडक दिल्याने 6 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. आराध्या धीरज नागदिवे (रा. पंजाब जालंधर) असे मृत मुलीचे नाव आहे. ही मुलगी मामाच्या लग्नासाठी आजीकडे राहण्यास आली होती.

 Nagpur  Girl Death
नागपूर : रिल्स बनविण्याच्या नादात उलटली कार; दोन युवक ठार, तीन गंभीर

संतप्त जमावाने बस रोखून धरली.

मिळालेल्या माहितीनुसार, बस (MH31 FC 0425) सीताबर्डी येथून पारडीकडे जात असताना हा अपघात झाला. संतप्त जमावाने बस रोखून धरली. गणेशपेठ पोलिस घटनास्थळी पोहचले व गुन्हा दाखल केला. बस चालकाचे नाव सुरेश पारधी तर कंडक्टरचे नाव राजकुमार पाटेकर असे आहे.

 Nagpur  Girl Death
नागपूर : मॉलमध्ये दहशतवादी, मेडिकल चौक परिसरात धावपळ

मामाच्या लग्नासाठी चिमुरडी नागपुराला आली होती

मृत चिमुरडीचे कुटुंब पंजाब येथील आहे. तिचे नातेवाईक नागपुरातच राहतात. मॉडेल मिल चाळीत तिचा मामा राहतो. त्याच्या लग्नासाठी ही चिमुरडी नागपुरात आली होती. घरातील सर्व जण लग्नाच्या गडबडीत होते. त्यावेळी आराध्याही घराच्या बाहेर खेळत होती. त्यावेळी खेळता खेळता ती धावत रस्त्यावर आली. त्यावेळी समोरून आलेल्या बसने तिला उडवले. त्यात तिचा अंत झाला. बस चालक सुरेश पारधी याला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news