Nagpur Crane Collapse | नागपुरात इमारतीचे बांधकाम सुरू असताना क्रेन कोसळली; दोन कामगारांचा मृत्यू

गणेशपेठेतील म्हाडा कॉलनी परिसरात दुर्घटना; मृत कामगार परप्रांतीय असल्याने ओळख अद्याप पटलेली नाही; बांधकामस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Nagpur MHADA Colony Crane Collapse
Nagpur MHADA Colony Crane CollapsePudhari
Published on: 
Updated on: 

Worker Deaths Nagpur

नागपूर : शहरातील गणेशपेठ परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी क्रेन कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.३०) घडली. कॉटन मार्केट येथील गीता मंदिर परिसरातील म्हाडा कॉलनीत ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बांधकामस्थळांवरील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, म्हाडा कॉलनी परिसरात एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना अचानक क्रेन कोसळली. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. मृत दोन्ही कामगार परप्रांतीय असल्याने त्यांची नावे आणि ओळख अद्याप समजू शकलेली नाही. दुर्घटनेमागील नेमके कारणही स्पष्ट झालेले नाही.

Nagpur MHADA Colony Crane Collapse
Nagpur News: प्रेमाचा त्रिकोण ठरला जीवघेणा! नागपुरात तरुणाची कुऱ्हाडीने वार करून हत्या

बांधकामस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नागपूर शहरात सध्या विविध भागांत मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. मात्र, या बांधकामस्थळांवर काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातात का, असा प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित होत आहे. क्रेनसारख्या अवजड यंत्रसामग्रीचा वापर करताना आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन करणे महत्त्वाचे असतानाही संबंधित कंपन्या आणि कंत्राटदारांकडून अनेकदा दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे.

विशेष म्हणजे, बांधकाम क्षेत्रात मोठ्या संख्येने परराज्यांतील मजूर काम करतात. अशा कामगारांच्या अपघातांबाबत माहिती अनेकदा मर्यादित स्वरूपात समोर येते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसह अपघातानंतरची जबाबदारी निश्चित करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.