Nagpur Fraud Recruitment | मत्स्य व्यवसाय विभागात नोकरभरती ; नवेगाव खैरी केंद्रातील ‘कनिष्ठ लिपिक’ पदाचे बनावट नियुक्तीपत्र व्हायरल

मत्स्य व्यवसाय विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे
scam news
प्रातिनिधिक छायाचित्र(File Photo)
Published on
Updated on

Navegaon Khairi Fisheries Department Recruitment

नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या नावाने बनावट नियुक्तीपत्र तयार करून सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी येथील मत्स्य बीज प्रजनन व उत्पादन केंद्रात ‘कनिष्ठ लिपिक’ पदावर नियुक्ती झाल्याचे दर्शविणारे बनावट पत्र समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पेंच प्रकल्पांतर्गत नवेगाव खैरी येथे असलेल्या मत्स्य बीज प्रजनन व उत्पादन केंद्रात सध्या लिपिक अथवा अन्य कोणत्याही संवर्गातील पदांसाठी थेट भरती प्रक्रिया सुरू नाही. मात्र, काही असामाजिक घटकांनी अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आणि खोटे शासकीय शिक्के वापरून २० ऑगस्ट २०२६ रोजीचे आणि क्रमांक ४६३/२०२६ असलेले बनावट नियुक्तीपत्र तयार केल्याचे निदर्शनास आले आहे.

scam news
Dahi Handi Nagpur | डीजेला फाटा: भजनाच्या तालावर रंगला दहीहंडीचा थरार; नरेंद्रनगरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतीकात्मक दहीहंडी फोडून उत्सवाला सुरुवात

मत्स्य व्यवसाय विभागातील शासकीय पदांची भरती केवळ शासनमान्य अधिकृत संकेतस्थळ, वृत्तपत्रांमधील अधिकृत जाहिराती आणि विहित शासकीय नियमांनुसारच केली जाते. त्यामुळे नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या कोणत्याही मध्यस्थ, दलाल किंवा तोतया व्यक्तीवर विश्वास ठेवू नये तसेच त्यांच्या सांगण्यावरून पैशांची देवाणघेवाण करू नये, असे आवाहन सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त शुभम कोमरेवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

संशयास्पद पत्र मिळाल्यास पोलिसांशी संपर्क

कोणत्याही नागरिकाला मत्स्य व्यवसाय विभागाच्या नावाने संशयास्पद नियुक्तीपत्र किंवा भरतीसंदर्भातील कागदपत्र मिळाल्यास त्याची सत्यता पडताळल्याशिवाय कोणतीही आर्थिक देवाणघेवाण करू नये. असे पत्र मिळाल्यास तातडीने जवळच्या मत्स्य व्यवसाय कार्यालयाशी किंवा स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध कठोर पोलीस कारवाई केली जात असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news