Nagpur News | नागपुरात साकारणार इएसआयसी मेडिकल कॉलेज

कर्मचारी राज्य विमा निगमची बैठक : देशभरामध्ये 10 नवीन मेडिकल कॉलेज स्थापन करण्याचा निर्णय
Nagpur News
प्रातिनिधीक छायाचित्र File Photo
Published on
Updated on

नागपूर -केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या कर्मचारी राज्य विमा निगमची बैठक शिमला, हिमाचल प्रदेश मध्ये पार पडली. या बैठकीमध्ये देशभरामध्ये 10 नवीन मेडिकल कॉलेज स्थापन करण्याचा निर्णय झाला. यामध्ये महाराष्ट्रात नागपूर आणि पुण्याचा समावेश होता. देशभरातील इतर 9 ठिकाणी कामगार विभागाने मेडिकल कॉलेजसाठीचा प्रस्ताव पाठवला आहे, फक्त नागपूरचा प्रस्ताव अद्याप शासनाला सादर झाला नसल्याबाबत मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी तारांकित प्रश्नावर बोलताना खंत व्यक्त केली.

नागपूरचे नेतृत्व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे ज्येष्ठ नेते करत असताना देखील मेडिकल कॉलेजसाठी प्रस्ताव पाठवण्यास विलंब का असा प्रश्न प्रवीण दटके यांनी विचारला. दरम्यान, हा प्रस्ताव पाठवल्यास MBBS च्या जागा वाढणार असून GMC IGMC सोबतच कामगार रुग्णालय मेडिकल कॉलेजच्या रूपात तिसरे मेडिकल कॉलेज नागपुरात तयार होईल, असे दटके म्हणाले.

नागपुरात नवे नागपूर आणि मिहान या माध्यमातून मोठी कामगार वसाहत निर्माण होत आहे, त्यांना यामाध्यमातून लाभ होईल तसेच रोजगार निर्मिती सुद्धा होणार आहे.हनुमान नगर, सिरसपेठ येथे सध्या 3 एकर मध्ये असणाऱ्या कामगार रुग्णालयात फक्त OPD होते, नवीन मेडिकल कॉलेज झाल्यास मोठ्या प्रमाणात कामगार रुग्णांना लाभ होईल यावर भर दिला. दटके यांच्या प्रश्नावर उत्तर देताना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विमा रुग्णालयाचे मेडिकल कॉलेज स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगितले तसेच प्रस्ताव पाठवण्यापूर्वी तांत्रिक त्रुटी दूर करून प्रस्ताव नव्याने केंद्र सरकारला पाठवू असे आश्वासित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news