

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील उबाठा शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे सुपुत्र, माजी विधान परिषद सदस्य दुष्यंत चतुर्वेदी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते मुंबई किंवा नागपुरातून शिवसेना ठाकरे गटातर्फे लढू शकतात अशी चर्चा होती.
निर्णायक क्षणी त्यांची समजूतही घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, अखेर त्यांनी उबाठा शिवसेना पक्षाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश करीत हाती भगवा झेंडा घेतला. आता त्यांचे पुनर्वसन कसे केले जाते. विदर्भात त्यांच्यावर कुठली जबाबदारी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसात अनेकांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे. मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाला अकोल्याचे माजी विधानपरिषद सदस्य गोपाकिशन बाजोरिया प्रामुख्याने उपस्थित होते.