Nagpur DJ Ban : नागपुरात आज रात्रीपासून १ नोव्हेंबरपर्यंत ‘डीजे’वर बंदी!

१ नोव्हेंबरपर्यंत डीजे, डीजे वाहने, डिम लाईट व लेजर लाईट वापरण्यास मनाई, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा निर्णय
Nagpur DJ Ban
Nagpur DJ Ban
Published on: 
Updated on: 

नागपूर: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज रात्रीपासून १ नोव्हेंबरपर्यंत डीजे, डीजेची वाहने, डिम लाईट तसेच लेजर लाईटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या काळात ध्वनिप्रदूषण तसेच नागरिकांना होणारा त्रास रोखण्यास मदत होणार आहे.

पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, निर्धारित कालावधीत शहरात डीजे साउंड सिस्टिम, डीजे वाहने, डिम लाईट आणि लेजर लाईटचा वापर करता येणार नाही. सार्वजनिक मिरवणुका, धार्मिक कार्यक्रम तसेच अन्य उत्सवांच्या वेळी या उपकरणांचा वापर केल्यास संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सव काळात मोठ्या आवाजात डीजे व ध्वनिवर्धकांचा वापर, तसेच लेजर लाईटमुळे नागरिक, वाहनचालक आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई

पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश मंडळे, आयोजक, डीजे चालक तसेच संबंधितांनी आदेशाचे पालन करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून शहरातील संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवले जाणार असून, आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news