Nagpur DJ Ban Controversy: पोलिसांनी तांत्रिक चूक केली... नागपुरातील डीजे बंदीवर भाजप शहर अध्यक्षांचीच नाराजी

Nagpur DJ Ban Controversy
Nagpur DJ Ban Controversypudhari
Published on
Updated on

Nagpur DJ Ban Controversy: पोलिसांनी नागपुरात डीजे बंदीला घोषणा केल्यानंतर भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी याला विरोध केला आहे. त्यांनी पुढारीशी बोलताना सांगितलं की, पोलीस प्रशासनाने काल एक परिपत्रक काढत डीजे वर बंदी घातली आहे. सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे. निश्चित डेसीबल मध्ये वाजल्यास कारवाई करणार नाही अशी परमिशन देण्याची गरज होती.

मात्र पोलिसांनी सरसकट यंत्रावर बंदी घातली आहे. ही पोलिसांची तांत्रिक चूक आहे. हे बंदी नोव्हेंबर पर्यंत लावण्यात आली. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंत बंदी का नाही? ठराविक कारवाई कारवाई का नाही.

Nagpur DJ Ban Controversy
Nagpur news: भारतात बेकायदेशीर वास्तव्य भोवले! नागपूर न्यायालयाचा बांगलादेशी पती-पत्नीबाबत मोठा निर्णय

दयाशंकर तिवारी यांनी सनातनी धर्माचे सण असतानाच ही बंदी घातली त्यावर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, 'सनातनी धर्माचे सण असताना बंदी घातली जाते. जन्माष्टमी दहीहंडी नागपूर मारबत आहे. गणेशोत्सव दुर्गा उत्सव आहे. हे सगळे लागोपाठ उत्सव असताना याचमध्ये डीजे बंदी का? बंदीचे कारण योग्य नाही.'

Nagpur DJ Ban Controversy
Nagpur News | लाचखोरी प्रकरणात नागपूर महानगरपालिकेच्या स्वास्थ निरीक्षकाला शिक्षा

डीजे बंदीचा फक्त नागपुरातच का मुंबई आणि इतर शहरांमध्ये लोकांना त्रास होत नाही का? पोलिसांनी आदेश काढले ते परत घ्यायला पाहिजे. डेसिबलच्या मर्यादित डीजे वाजला पाहिजे.. यासाठी काटेकोर पालन करावे. अशी देखील मागणी दयाशंकर तिवारी यांनी केली.

Nagpur DJ Ban Controversy
Nagpur Cobra Rescue | नागपूर : न्यायाधीश निवासस्थानातून पाच फुटी नागाचे थरारक रेस्क्यू

तिवारींनी म्हणाले की, पोलिसांनी सरसकट डीजे बंदीचा परिपत्रक काढलं. पोलीस आयुक्तांची वेळ आमदार प्रवीण दटके यांनी घेतली आहे. त्यांना आम्ही जाऊन भेटू. चौकटीच्या बाहेर जाणाऱ्यावर कारवाई केल्यास आमची मनाई नसेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news