

नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक नरेश साधूरावजी बर्वे (वय : 54 वर्ष) यास 5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचे मालकीचे घर नंबर 655 व 655 ए, शिट नंबर 241, खसरा क्रमांक 145 व 146, नझुल प्लॉट नंबर 103, शिवाजीनगर, महाल, नागपूर येथील 1135 चौरस फूट प्लॉटवर झालेल्या बांधकाम संबंधाने तक्रारदार यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर (स्लम) येथे अपील दाखल केली होती.
तक्रारदार यांचे प्रकरण निकाली काढण्याकरिता बर्वे यांनी 5 लाख रुपयाची मागणी केली. शुक्रवारी रात्री 11 ते 12 दरम्यान नंदनवन लेआऊट परिसरात आपल्या घराजवळ बोलावले होते. तक्रारदारासोबत एसीबीने सापळा रचून सदर रक्कम स्वीकारताच महसूल सहाय्यक बर्वे यास ताब्यात घेण्यात आले. यासोबतच अँप्पल 13 कंपनीचा आयफोन ताब्यात घेण्यात आला असून आरोपीची घरझडती देखील केली जात आहे. पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग श्रीमती भारती गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलिस निरीक्षक विवेक पडघान यांनी केली.