Nagpur Crime : पाचपावलीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार!

वैद्यकीय तपासणीत मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड; १९ वर्षीय आरोपीला अटक
POCSO
Nagpur Crime : पाचपावलीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार!Pudhari
Published on: 
Updated on: 

नागपूर : नागपूर  पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. प्रकृती बिघडल्याने करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत पीडिता सुमारे पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आला. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी १९ वर्षीय श्रीधर ईश्वर राजकटटा याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलिसांकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून पीडित अल्पवयीन मुलीची आरोपीसोबत ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. एप्रिल २०२६ मध्ये आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घटनेनंतर काही दिवसांनी पीडितेची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ती सुमारे पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. हा प्रकार समजल्यानंतर कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी याबाबत पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी १९ वर्षीय श्रीधर ईश्वर राजकटटा याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविला. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news