Nagpur crime |मेहुणीला सिगारेट का दिली?... मेहुण्याचा मायलेकावर चाकू हल्ला

पोलिसांनी हल्लेखोर गौरव व त्याचा मित्र आकाश यांच्यावर गुन्हा दाखल केला.
Jalgaon Knife Attack
Jalgaon Knife AttackPudhari
Published on
Updated on

नागपूर : बदलत्या विश्वात, संतापाच्या भरात रोज ऐकाव ते नवलच घडत आहे. एका मेहुणीला सिगारेट का दिली ? म्हणून भाऊजीने मायलेकावर चाकू हल्ला केल्याची घटना उघडकीस आली.

जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत जिंजर मॉल परिसरात विद्या व त्यांच्या पतीचे पानठेला व चहा विक्रीचे दुकान आहे. गेल्या काही दिवसापासून गौरवची मेहुणी येथे सिगारेट पिण्यासाठी येत होती. याविषयी गौरवला माहिती होताच त्याने मेहुणीला सिगारेट द्यायची नाही, अशी धमकी विद्या यांना दिली. मात्र गौरवची मेहुणी मित्रासह पान ठेवल्यावर आली. तिने नेहमीप्रमाणे सिगारेट घेतली. याबाबत माहिती होताच गौरव हा मित्रासह तिथे दाखल झाला. त्याने विद्या यांच्यासोबत वाद घातला.विद्याने चंचल याला बोलावले गौरवने चंचलला चाकूचा धाक दाखवला. गौरव हा त्यांच्यावर चाकू हल्ला करेल अशी भीती विद्या यांना वाटली त्यामध्ये पडल्याने विद्याच्या डाव्या हातावर चाकूने वार केला.

दरम्यान ,चंचल मदतीसाठी धावला असता त्याच्या पोटावरही वार केला. त्यानंतर त्यांच्या मदतीसाठी आलेल्या सुजलवरही गौरवने चाकूने वार केला. आकाशने पानठेल्यावरील साहित्य तोडफोड केली व त्यानंतर गौरव आणि आकाश पसार झाले. उपचारानंतर विद्या यांनी दिलेल्या तक्रारीवरूनन जरीपटका पोलिसांनी हल्लेखोर गौरव व त्याचा मित्र आकाश यांच्यावर गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news