Nagpur Crime News : नागपूर हादरले! जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याने केला सुनेचा कुऱ्हाडीने निर्घृण खून

हत्या केल्यानंतर आरोपी सासऱ्याचा विहिरीत उडी घेऊन जीवन संपविवण्‍याचा प्रयत्न; प्रकृती चिंताजनक
Nagpur Crime News
Nagpur Crime NewsPudhari
Published on: 
Updated on: 

Nagpur Crime News : जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याने सुनेची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्‍कादायक घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. लक्ष्मी रविशंकर पाली (४२) असे मृत सुनेचे नाव असून नथुलाल भगवान पाली (७०) असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे. सुनेचा खून केल्यानंतर आरोपी सासऱ्याने विहिरीत उडी घेऊन जीवन संपविण्‍याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने विहिरीतून बाहेर काढून मेयो रुग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.

जादूटोण्याच्या संशयातून भयंकर कृत्‍य

मुलावर जादूटोणा करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत असल्याच्या संशयातून सासऱ्याने हे कृत्य केले. मृत लक्ष्मी यांच्या पतीचे २०१९ मध्ये निधन झाले होते. त्यानंतर मुलावर जादूटोणा केल्याचा संशय घेत नथुलाल यांचा सुनेसोबत वारंवार वाद होत होता. शनिवारी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादातून नथुलाल यांनी कुऱ्हाडीने लक्ष्मी यांच्या डोक्यावर वार केला, यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.

Nagpur Crime News
Nagpur Crime | प्रेमसंबंधातून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; प्रियकराला अटक

सासऱ्याचा विहिरीत उडी घेऊन जीवन संपविवण्‍याचा प्रयत्न

सुनेचा खून केल्यानंतर आरोपी सासऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने विहिरीतून बाहेर काढून मेयो रुग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक युनूस चांद शेख यांनी दिली.

Nagpur Crime News
Nagpur Crime : दुकान फोडून १.७० लाखांची चोरी; दोन अल्पवयीनांसह ५ जण पोलिसांच्या जाळ्यात, ७० हजारांची रोकड हस्तगत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news