

नागपूर - नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर रोडवरील फेटरी गावाच्या परिसरातील ओयो हॉटेलमध्ये प्रियकरांकडून प्रेयसीची हत्या करण्यात आल्याची घटना आज शुक्रवारी उघडकीस आली.
रुचिता भांगे असे या मृतक तरुणीचे नाव असून प्रियकरानेही वरून उडी मारत पळ काढला. प्रेम प्रकरणातून झालेल्या या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नागपूरात गेल्या दोन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी पाच हत्येच्या घटना घडल्या आहेत.
ओयो हॉटेलमध्ये या दोघांमध्ये झालेल्या वादातून प्रियकराने चाकूने प्रेयसीच्या गळ्यावर वार केला. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली. आणि काही वेळात तिचा मृत्यू झाला. हत्या करून आरोपी प्रियकराने हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारुन पळ काढला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून आता फरार प्रियकराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.