

नागपूर : शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत ५४ किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत १३.७४ लाख रुपये असून, एकूण १६.५१ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
अटकेतील आरोपी
या प्रकरणी पोलिसांनी शेख जावेद शेख मुन्ना (वय ३९) आणि मोहम्मद हारून रशीद पिंजारी (वय ३९, दोन्ही रा. दलाल चौक, तेलिपुरा, लालगंज, पेवठा) या दोन आरोपींना अटक केली आहे.
कारवाईचा तपशील
आज पहाटे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर भोगे यांनी ही धडक कारवाई केली. आरोपींकडून गांजासोबतच तीन मोबाईल, एक सुझुकी मोपेड, इलेक्ट्रिक वजनकाटा आणि १,३५,५७० रुपये रोख रक्कम असा एकूण १६,५१,५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शांतीनगर पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.