

Political News Nagpur
नागपूर: महान क्रांतीकारक शहीद भगतसिंह यांच्या जयंतीनिमित्ताने नागपूरमध्ये काँग्रेस पक्षाने मशाल मोर्चा काढला व संविधान चौकात सभा घेतल्यानंतर सोमवारी (दि.२९) दीक्षाभूमीपासून सेवाग्राम आश्रम पर्यंत संविधान सत्याग्रह पदयात्रेला सुरुवात केली.
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पदयात्रा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व नागपूर,विदर्भातील काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यात सहभागी झाले आहेत. शिवसेना नेत्या सुषमाताई अंधारे, माजी आमदार अशोक धवड, विशाल मुत्तेमवार, शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, संजय मेश्राम, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नाना गावंडे, नागपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अश्विन बैस यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.