Nagpur Collector Inspection | नागपूर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची दुचाकीवरून घनकचरा व्यवस्थापनाची पाहणी

बेसा-पिपळा-बेलतरोडी आणि कुही नगरपंचायतीतील व्यवस्थेचा घेतला आढावा
Nagpur Collector Inspection
घनकचरा व्यवस्थापनाची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दुचाकीवरून आकस्मिक पाहणी केली. Pudahri
Published on
Updated on

Nagpur Solid Waste Management

नागपूर : महानगरपालिकेच्या वाढत्या विस्तारासोबतच नागपूर शहरालगतच्या बेसा-पिपळा-बेलतरोडी आणि कुही नगरपंचायतीच्या हद्दीत घनकचरा व्यवस्थापनाची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आकस्मिक पाहणी केली. विशेष म्हणजे, पाहणीसाठी त्यांनी शासकीय वाहनाचा वापर न करता स्वतः दुचाकीवरून परिसराची पाहणी करत घनकचरा व्यवस्थापनासह विविध नाल्यांचीही स्थिती जाणून घेतली.

बेसा-पिपळा-बेलतरोडी नगरपंचायतीच्या हद्दीत सुमारे ७५ हजार लोकसंख्या आहे. नागपूर शहरातून वाहणारे बहुतांश नाले या नगरपंचायतीच्या क्षेत्रातून पुढे जातात. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असल्याने गावपातळीवर या व्यवस्थेची अंमलबजावणी कशी केली जाते, याचा जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला.

Nagpur Collector Inspection
Nagpur News | विद्यार्थिनीच्या हाकेला जिल्हाधिकाऱ्यांची साद; खेतापूरला एसटी बससेवा सुरू

बेसा-पिपळा-बेलतरोडी नगरपंचायतीने घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ‘हरित ब्रँड’ म्हणून विशेष ओळख निर्माण केली आहे. या परिसरातून दररोज सुमारे २२ टन घनकचरा संकलित केला जातो. त्यापैकी सुमारे १३ टन ओला कचरा असतो. या ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी नगरपंचायतीच्या हद्दीत ४८ कंपोस्ट पिट्स तयार करण्यात आले आहेत.

दरम्यान, कुही नगरपंचायतीची लोकसंख्या सुमारे १० हजार ७०० असून येथे दररोज दीड ते दोन टन घनकचरा संकलित केला जातो. या कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि प्रक्रिया याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

Nagpur Collector Inspection
Nagpur crime news: नागपूर RTOचा दलाल हिंगोली एसीबीच्या जाळ्यात, वाहतूकदारकडून घेतली लाच

या आकस्मिक पाहणीमुळे घनकचरा व्यवस्थापनाची प्रत्यक्ष परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आली असून, नागरिकांचे आरोग्य आणि परिसराची स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news