Nagpur Ganeshotsav | केंद्र, राज्य सरकारचा निषेध करणारा पुरींचा बाप्पा अखेर विराजमान

Ganesh Chaturthi 2025 | पाचपावली परिसरातील पाच कलश मंदिर नंदगिरी येथे गणेशच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे
Chandrashekhar Puri Ganesh installation
पाचपावली परिसरातील पाच कलश मंदिर नंदगिरी येथील गणेशमूर्ती Pudhari
Published on
Updated on

Chandrashekhar Puri Ganesh installation

नागपूर : चंद्रशेखर पुरी यांचा राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करणारा गणपती अखेर गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी विराजमान झाला आहे. पाचपावली परिसरातील पाच कलश मंदिर नंदगिरी येथे भाविकांनी या गणेशमूर्तीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.

अमेरिकन सरकारचा भारत- पाक संबंधात, ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेला वाढता हस्तक्षेप आणि यानंतरच्या अमेरिकन धोरणात्मक बाबींचा निषेध या गणेशोत्सवात करण्यात आला आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी मात्र विविध अडचणींनी भरडला जात आहे. त्याच्या दुःखाकडे कुणाचेच लक्ष नाही. राज्य व केंद्र सरकार वेगळ्या विदर्भाकडे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही. विदर्भ विकासाचा केवळ देखावा केला जात असल्याचेही टीकास्त्र वेगवेगळ्या बॅनर, फलकांमधून सोडले गेले आहे.

Chandrashekhar Puri Ganesh installation
Nazul Land Amnesty Scheme | नागपूर, अमरावती विभागातील नझुल जमिनींसाठीच्या विशेष अभय योजनेला मुदतवाढ

उपराजधानीत पुरी कुटुंबाने ही सर्वसामान्यांच्या मनातील असंतोष,खदखद व्यक्त करणारी निषेधाची अफलातून परंपरा गेली अनेक वर्षे जपली आहे. आधी दिवंगत गुलाब पुरी यांनी ही परंपरा सुरू केली. बहुतांशी वेळा त्यांची ही गणेशमूर्ती स्थापना होताच पाचपावली पोलिस जप्त करून आपल्या ताब्यात घेत होते. आता त्यांचे सुपुत्र चंद्रशेखर गुलाब पुरी यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली आहे.

मात्र, फारसे आक्षेपार्ह नसल्याने आता पोलीस देखील खबरदारी म्हणून चूक बंदोबस्त ठेवतात मात्र गणेश मूर्ती जप्त करण्याची परंपरा काहीशी खंडित झाली आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी निघणाऱ्या 145 वर्ष जुन्या पिवळ्या काळया मारबत मिरवणुकी पाठोपाठ गणेशोस्तव काळात ही देखील नागपूरची अफलातून परंपरा मानली जाते हे विशेष.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news