Nagpur Bribe | जलसंपदा अधीक्षक अभियंत्याने घेतली 70 हजारांची लाच, एसीबीची कारवाई

प्रलंबित २५ लाख रूपयाचे बिल काढण्यासाठी मागितली होती लाच
Bribe News
Bribe News
Published on
Updated on

नागपूर - करजखेडा जि. भंडारा येथील १० लाख आणि लखमापूर जि. नागपूर येथील १५ लाख रूपयाचे असे एकुण प्रलंबित २५ लाख रूपयाचे बिल आणि नवीन कामासाठी 2 टक्के दराने 70 हजार रुपये स्वीकारताना जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता रविंद्र वानखेडे आज गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.

अधीक्षक अभियंता रविंन्द्र निलकंठराव वानखेडे, यांत्रिकी मंडळ, जलसंपदा विभाग येथे कार्यरत असून २ टक्के प्रमाणे ५० हजार रूपयेची लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी एसीबी नागपूर कार्यालयात केली. तडजोडीअंती २ टक्के प्रमाणे ५० हजार रूपये आणि नविन काम भुराटोला जि. भंडारा आणि खडकी मायनर, नागपूर येथील १० लाख रूपयाचे पाटबंधाऱ्याची निविदा तक्रारदार यांचे नावे मंजूर करून देण्याकरिता २ टक्के प्रमाणे २० हजार रूपये असे एकुण ७० हजार रूपये लाचेची मागणी केली. याशिवाय त्यांचे ताब्यातून ३६,६३० रुपये जप्त करण्यात आले. पोलीस स्टेशन धंतोली, नागपूर शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला.ही कारवाई डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news