

नागपूर - नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी, बोगस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नियुक्तीचा शिक्षण घोटाळा राज्यभर व्याप्ती असल्याचे लक्षात आल्यानंतर शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासासाठी राज्यस्तरीय विशेष तपास पथक एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.या विशेष तपास पथकाच्या प्रमुख पदी पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था डॉ. मनोज कुमार शर्मा यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.नागपूरसह जळगाव आणि नाशिकमध्ये बोगस शालार्थ आयडीचे गुन्हे दाखल झाले. या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभरात असल्याने सखोल तपासासाठी राज्यस्तरीय आयआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीत कोणाची निवड करावी याविषयाचे सर्वाधिकार आता झा यांना असतील. नागपूर आयुक्त कार्यालयात दाखल तक्रारीसाठी स्थापन एसआयटीत पोलीस उपायुक्त ,सहाय्यक पोलीस आयुक्त, सायबर व सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक व चार पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.