

नागपूर - नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील जवळी गावाजवळच्या धामणगावात आज शनिवारी मोठी आग लागली. आगीत मोठ्या प्रमाणावर जीवित, वित्त हानी झाल्याची भीती वर्तविली जात आहे. रात्री उशिरापर्यंत ही आग धुमसत असून आगीचे कारण कळू शकले नाही. दोन ते तीन लोकांचा मृत्यू झाल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
रात्री उशिरापर्यंत नागपूरसह ठिकठिकाणच्या अग्निशमन वाहनांनी धाव घेतली असून पूर्ण गाव जळाल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आग आटोक्यात आणण्यासाठी आणखी गाड्यांची गरज व्यक्त होत आहे. भिवापूर पोलिस घटनास्थळी पोहोचले असून नागपूरवरून सुद्धा दोन तीन अग्निशमन वाहने आग विझविण्यासाठी निघाले आहेत.