

Worker Dies in Explosion Solar Company
नागपूर : अमरावती रोडवरील बाजारगावच्या सोलार एक्सप्लोसिव्हमध्ये झालेल्या भीषण स्फोटातील गंभीर जखमीतील आणखी एका कामगाराचा आज (दि.६) सकाळी मृत्यू झाला. निकेश इरपाची असे या मृत कामगाराचे नाव असून त्यांच्यामागे पत्नी आणि दीड वर्षाची मुलगी आहे.
यापूर्वी मृत्यू झालेला युवक चंद्रपूरचा होता. मयूर गणवीर असे मृताचे नाव आहे. या स्फोटात 13 कामगार जखमी झाले. 4 जण आयसीयुत होते. तर इतर 9 कामगारांवर दंदे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. काहींना त्याच दिवशी लवकरच उपचारानंतर सुटी दिली.
सोलार एक्सप्लोसिव्हमध्ये मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हा भीषण स्फोट झाला. सोलार एक्सप्लोसिव ही खाजगी क्षेत्रातील स्फोटके निर्माण करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. स्फोटात जखमींमध्ये कैलास वर्मा, मनीष वर्मा, सनी कुमार, अरुण कुमार, अतुल मडावी, सौरभ डोंगरे, तेजस बांधते, सुरज गुटके, अखिल बावणे, धर्मपाल मनोहर यांचा समावेश होता.
दरम्यान, स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीत वारंवार अशा प्रकारच्या घटना घडू नयेत. या दृष्टीने राज्य सरकार आणि व्यवस्थापन यांनी तातडीने ठोस सुरक्षात्मक उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी या निमित्ताने माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार चरणसिंग ठाकूर यांनी केली. यापूर्वीही या सोलर कंपनी तसेच चामुंडी एक्सप्लोसिव्हमध्ये झालेल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला.