

Nagpur Accident News
नागपूर - महाल परिसरात कोतवाली पोलीस स्टेशनसमोर बांधकाम सुरू असलेल्या बी पार्क प्रोजेक्टची भिंत कोसळून दोन पोकलेन मातीत गाडले गेले. तीन मजूर जखमी झाले त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने कुठलीही प्राणहानी झालेली नाही. बुधवार बाजार कोतवाली पोलीस स्टेशनसमोर आऊटर पाईल पोकलेन माती काढताना पाईल घसरले आणि ते दोन्ही पोकलेनवर पडले. त्यामध्ये हे 3 परप्रांतीय कामगार जखमी झाले
अजित परमनिक 26, मनीष नागेश्वर 22,चिंटू कुमार 33 अशी त्यांची नावे असल्याची माहिती मनपाचे सीनियर सिव्हिल इंजिनिअर सुनील काठे यांनी दिली. या परिसरात नागरिकांनी पुरेशी खबरदारी घ्यावी असे आवाहन आता या घटनेनंतर मनपाने केले आहे. बाजूला चावला स्टोर, चंदना इंटरप्राईजेस ही विजय केवलरामानी यांची इमारत या घटनेने धोकादायक बनली आहे त्यांनाही सतर्क करण्यात आले. आजूबाजूची घरे खाली करण्यात आली अशी माहिती मनपा अग्निशमन विभागाने दिली.