

ARTO Clerk caught bribery
नागपूर : गिट्टीने भरलेला ओव्हरलोड ट्रक पकडल्यानंतर पन्नास हजार रुपयांचे चलान ठोकण्यात आले. हे चलान रद्द करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागण्यात आली. चार हजार रुपये स्वीकारताना सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि एक कनिष्ठ लिपिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
सहायक परिवहन अधिकारी अनुप सानप आणि कनिष्ठ लिपिक मोहन दिवटे अशी या दोन लोकसेवकांची नावे आहेत. मोहन दिवटे यांनी चार हजारांत हा व्यवहार निश्चित केला आणि रक्कम स्वीकारली. विशेष म्हणजे यास सहायक परिवहन अधिकाऱ्यांनी सहमती दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.