Vehicle Theft Nagpur | चोरीची बुलेट जप्त; एक आरोपी ताब्यात, दोघांचा शोध सुरू

शांतिनगर पोलिस ठाण्यातील गुन्ह्याचा छडा; वाहन चोरीविरोधी पथकाची कारवाई;
Anti Vehicle Theft Squad Nagpur
Anti Vehicle Theft Squad NagpurPudhari
Published on
Updated on

Anti Vehicle Theft Squad Nagpur

नागपूर : वाहन चोरीविरोधी पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कारवाई करत शांतिनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीला गेलेली रॉयल एनफिल्ड बुलेट जप्त केली. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्या दोन साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

शांतिनगर पोलिस ठाण्यात वाहन चोरीप्रकरणी गुन्हा क्रमांक १९४/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान वाहन चोरीविरोधी पथकाला आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली. तसेच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी विनोद उर्फ गद्दू राजू लांजेवार (वय २६, रा. कौशल नगर, पिवळी नदी, कामठी रोड, नागपूर) याला ताब्यात घेतले.

Anti Vehicle Theft Squad Nagpur
Nagpur News | ऑटोचालकाचा प्रामाणिकपणा: हरवलेली साडेचार लाखांची बॅग महिलेकडे केली सुपूर्द

पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट (क्रमांक एमएच ४० बीझेड ३७७८) जप्त केली. या वाहनाची अंदाजे किंमत १ लाख ७५ हजार रुपये आहे. या प्रकरणात विक्की योगेश डेहेरिया (वय २२, रा. इंदिरा माता नगर, यशोधरा नगर) आणि पियुष दीपक निमजे (वय १८, रा. धम्मदीप नगर, यशोधरा नगर) हे दोघे पाहिजे आरोपी असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी शांतिनगर पोलिस ठाण्यातील दिवसपाळी अधिकारी पीएसआय सिंग यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news