Anil Deshmukh | भाडोत्री गुंडाच्या मदतीने पोलिसाने घर तोडलेल्या कुटुंबीयांना न्याय द्या : अनिल देशमुख

Nagpur News | जरीपटका भागात पोलीस कर्मचारी अजिंक्य घुले याने एका महिलेचे घर उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक घटना
Nagpur House Demolition Controversy
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली.Pudhari
Published on
Updated on

Nagpur House Demolition Controversy

नागपूर : शहरातील जरीपटका भागात पोलीस कर्मचारी अजिंक्य घुले याने कायद्याचे उल्लंघन करत एका महिलेचे घर उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागसेन नगर येथील स्मिता रवींद्र वासनिक (शकुंतला वासनिक) यांचे हे घर आहे. पोलीस कर्मचारी अजिंक्य दादाराव घुले याने 30 ते 40 भाडोत्री गुंड आणि बाऊन्सर्स आणून बेकायदेशीरपणे बुलडोझरने घर पाडून टाकले. या संतापजनक प्रकारानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी (दि.१०) पीडित कुटुंबाची भेट घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली.

6 एप्रिलला जरीपटका येथील प्लॉट नंबर 106 वर हा प्रकार घडला. यावेळी घरात असलेल्या स्मिता वासनिक यांच्या मुलीला आणि वृद्ध सासूला या गुंडांनी ओढत घराबाहेर काढले व अमानुष मारहाण केली. कोणतीही अधिकृत परवानगी किंवा नोटीस नसताना बुलडोझर फिरवून पूर्ण घर जमीनदोस्त करण्यात आले. रक्षकच भक्षक बनल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Nagpur House Demolition Controversy
Anil Deshmukh | सेफ्टी ऑडिट, हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन अटक करा : अनिल देशमुख बैठकीत संतापले

अनिल देशमुख यांनी नागसेन नगर गाठले. त्यांनी उद्ध्वस्त झालेल्या घराची पाहणी केली आणि वासनिक कुटुंबीयांचे सांत्वन केले. "एका पोलीस कर्मचाऱ्याने अशा प्रकारे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना एकत्र करून घर पाडणे, हा प्रकार लोकशाहीला घातक आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या प्रकरणाची दखल घेत अनिल देशमुख यांनी नागपूर पोलीस आयुक्तांना लेखी पत्र दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अफजल फारुकी, वर्षा श्यामकुळे, नगरसेवक शैलेश पांडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

नानोरे कुटुंबीयांचे सांत्वन

दरम्यान,गिट्टीखदान परिसरातील अथर्व नानोरे या 14 वर्षांच्या मुलाचे नुकतेच अपहरण करून हत्या करण्यात आली. अनिल देशमुख यांनी नानोरे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.दोषी आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी कुटुंबीयांनी देशमुख यांच्याकडे केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news