Nagpur AI News | नागपुरात शिक्षणाची नवी क्रांती! पहिल्या 'AI' मराठी शाळेचे दिमाखात भूमिपूजन

परंपरा आणि तंत्रज्ञानाचा साधला जाणार संगम 
AI
AIPudhari
Published on
Updated on

नागपूर : भारतीय विद्या प्रसारक संस्‍थेद्वारा संचालित नूतन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अभ्यंकर नगर अंतर्गत प्रस्तावित ‘पूजनीय गोळवलकर गुरुजी एआय पब्लिक स्कूल’च्या नवीन इमारतीच्या उभारणीसाठी भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला.

सर्वश्री श्रीधर महाजन, नचिकेत दादा ओझरकर, नगरसेवक दिलीप दिवे, अविनाश संगवई, नरेंद्र सातपुते व समीर महाजन यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष कृ. दा. पत्तरकिने यांनी भूषविले. यावेळी भारतीय विद्या प्रसारक मंडळाचे सचिव रमेश बक्षी, सहसचिव अतुल गाडगे आणि कोषाध्यक्ष व मुख्याध्यापक डॉ. सौ. वंदना बडवाईक यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती. 

नागपूरातील ही पहिली एआय-आधारित मराठी शाळा असून, या शाळेत संस्कृती, संस्कार, परंपरा, तत्त्वज्ञान यांसोबतच आधुनिक तंत्रज्ञान व रोबोटिक्सचा समन्वय साधला जाणार आहे, अशी माहिती संस्‍थेचे सचिव रमेश बक्षी यांनी यावेळी दिली. कृत्रिम बुद्धीमत्‍ता म्‍हणजे एआय च्‍या माध्‍यमातून इंग्रजीतील प्रभुत्‍व, कॉम्‍प्‍युटरचे सखोल ज्ञान, मराठीची ओजस्‍वी अभिव्‍यक्‍ती व मानवी संवेदनाची जपणून करून सशक्‍त, संस्‍कारित व सक्षम पिढी घडवण्‍याचा उद्देश असल्‍याचे डॉ. वंदना बडवाईक यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. मानसी कोलते यांनी केले.  यावेळी संध्या महाजन, माया पत्तरकीने, जयश्री बक्षी, मनिषा प्रधान, गणेश अभ्यंकर, किरण गडकरी, संजय पानसे, ललित तपासे, डॉ. राहुल पेठे, डॉ. प्रसाद सिवाल, विरेन्द्र रानडे, तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी,  पालक, व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news