

नागपूर : विदर्भातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यात पूर्व विदर्भात भाजपने मोठे यश मिळवले, तर पश्चिम विदर्भात संमिश्र निकाल लागला आहे.
नागपूर जिल्ह्यातील २७ पैकी तब्बल २२ नगराध्यक्षपदे भाजपने जिंकली आहेत. काँग्रेसचे खासदार शामकुमार बर्वे आणि माजी मंत्री सुनील केदार यांनाही त्यांच्या गावात भाजपकडून पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शेकापसोबत लढत आपला नगराध्यक्ष निवडून आणत भाजपला धक्का दिला. भाजप, राष्ट्रवादी आणि शेकाप यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतिष्ठेच्या कामठी नगर परिषदेत भाजपने अखेरच्या क्षणी काँग्रेसवर मात करत विजय मिळवला. तब्बल ४० वर्षांनंतर भाजपला येथे यश मिळाले. मात्र शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यांना विदर्भात अद्याप अपेक्षित यश मिळालेले नाही.
यवतमाळ जिल्हा : येथे महाविकास आघाडी आणि महायुतीला संमिश्र यश मिळाले.
पांढरकवडा – अतिश बोरेले (भाजप)
दारव्हा – सुनील चिरडे (शिवसेना)
नेर – सुनीता जयस्वाल (शिवसेना)
आर्णी – नालंदा भरणे (काँग्रेस)
घाटंजी – परेश कारिया (काँग्रेस)
उमरखेड – तेजश्री जैन (काँग्रेस)
पुसद – मोहिनी नाईक (राष्ट्रवादी अजित पवार)
ढाणकी – अर्चना वासमवार (शिवसेना उबाठा)
बुलढाणा जिल्हा : ११ नगर परिषदांपैकी ४ ठिकाणी भाजप, ३ ठिकाणी काँग्रेस, तर उर्वरित चार नगर परिषदांवर दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना पक्षांनी प्रत्येकी एक-एक नगराध्यक्षपद जिंकले. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना मेहकर व लोणार या दोन्ही ठिकाणी पराभवाचा धक्का बसला.
मेहकर – किशोर गारोळे (शिवसेना उबाठा)
जळगाव जामोद – गणेश दांडगे (भाजप)
शेगाव – प्रकाश शेगोकार (काँग्रेस)
बुलढाणा – पुजाताई गायकवाड (शिवसेना शिंदे गट)
चिखली – पंडितराव देशमुख (भाजप)
सिंदखेडराजा – सौरभ तायडे (राष्ट्रवादी शरद पवार)
देऊळगाव राजा – माधुरी शिंपणे (राष्ट्रवादी अजित पवार)
गडचिरोली जिल्हा : गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज या तिन्ही नगर परिषदांमध्ये भाजपने सत्ता मिळवली.
गडचिरोली – प्रणोती निंबोरकर
आरमोरी – रुपेश पुणेकर
देसाईगंज – लता सुंदरकर
नगरसेवक पदांच्या २७ जागांपैकी भाजप १५, काँग्रेस ६, राष्ट्रवादी अजित पवार गट ५, तर एका जागेवर परिवर्तन पॅनलचा उमेदवार विजयी झाला.
भंडारा जिल्हा :
भंडारा – मधुरा मदनकर (भाजप)
तुमसर – सागर गभने (अपक्ष)
पवनी – विजया नंदुरकर (राष्ट्रवादी अजित पवार)
साकोली – देवश्री कापगते (भाजप)
नगरसेवक संख्या : भाजप ५५, काँग्रेस १४, राष्ट्रवादी अजित पवार १५, शिवसेना शिंदे ११, अपक्ष ५.
अमरावती जिल्हा : १२ पैकी ६ ठिकाणी भाजप, काँग्रेसला २, तर शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, प्रहार आणि वंचित बहुजन आघाडीला प्रत्येकी एक नगराध्यक्षपद मिळाले.
अकोला जिल्हा : भाजप ४, काँग्रेस १ आणि वंचित बहुजन आघाडी १ नगराध्यक्षपदावर विजयी झाली.
चंद्रपूर जिल्हा : येथे काँग्रेसची जोरदार मुसंडी पाहायला मिळाली. ११ पैकी ७ ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले. भाजपला केवळ दोन ठिकाणी यश मिळाले, तर एका ठिकाणी अपक्ष आणि एका ठिकाणी शिवसेना (शिंदे गट)चा उमेदवार विजयी झाला. भाजपचे नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पराभव स्वीकारत स्पष्ट प्रतिक्रिया दिली.