

नागपूर - ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचाकडे आता फार काही पर्याय नाहीत. धनंजय मुंडेंची विकेट काढून छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा विचार अजित दादाच्या मनात आहे काय ? अजित पवार मुंडे यांच्या प्रकरणात अजिबात बोलत नाहीत. यात कुछ तो गडबड है... असा इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
छगन भुजबळ यांच्या नाराजीसंदर्भात बोलताना नाराजी व्यक्त करून पर्याय काय, एक तर भाजपकडे जा नाहीतर घरी बसा असा टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. ओबीसी नेत्याचा महाराष्ट्रामध्ये सरकारने दूरूपयोग केला, सत्तेबाहेर ठेवलं, मोठ्या नेत्याला मते मिळाली. याचा फायदा भाजपला झाला पण भुजबळ यांना भोपळा दिला. ओबीसीला गृहीत धरून ओबीसींच्या भावनांशी खेळणारे हे सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच्या भेटीत काहीतरी झाले असेल. भुजबळ यांना देशाचे ओबीसी नेता भाजप करेल तो पर्याय खुला राहील असे वाटते असेही ते म्हणाले. अनेक प्रश्न आहेत. अजूनही पालकमंत्री नेमले जात नाहीत. काय चालले आहे असा सवाल उपस्थित केला. मुख्यमंत्री यांनी 26 जानेवारीला स्वतः दोन दोन मिनिटे देऊन सगळे झेंडे फडकवावेत. लोकांना वाऱ्यावर सोडून मलिदा खाण्याचे काम सुरू आहे. थोडी जणांची नाही तर मनाची तरी ठेवा असा सबुरीचा सल्ला दिला.
कराड आत्मसमर्पण संदर्भात बोलताना गृहमंत्री यांनी लक्ष दिले पाहिजे. पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे. त्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर पोलीस विभागाचे वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. सीआयडी तपास सुरू होता मग एसआयटी कशाला नेमली, आता ही स्वतंत्र चौकशी ठरेल का? चांगलं काम करतील म्हणून नेमले का? आरोपी बाहेर येऊ नयेत .90 दिवसाच्या आत चार्जशीट कोर्टात गेली पाहिजे.
आशाताई पवार यांनी व्यक्त केलेली भावना आणि दोन्ही पवार एकत्र येणार याविषयी चर्चेवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, अजितदादा साकडे घालून मागणी करत असेल तर तो विठ्ठलच ठरवेल. (शरद पवार) आपण सगळे विठ्ठलावर सोडून देऊ,आपली प्रतिक्रिया देण्यापेक्षा विठ्ठलाच्या मनात नेमकं काय आहे ते विठ्ठलच ठरवेल.
मनपा निवडणुकीबाबत आमची चर्चा उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुरू आहे. एखाद्या पक्षाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यांचा मार्ग जो त्यावेळेस ठरेल, त्यावर आमचाही मार्ग ठरेल. मध्यंतरी अडीच वर्ष सरकार आल्यानंतर काय केले असे आमच्यावर आरोप होत होते. सुप्रीम कोर्टात ओबीसीचा विषय होता. कोरोना काळातही आम्ही निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला. आता तीन वर्षे होऊन निवडणुका होत नाहीत तर सत्तेचे केंद्रीकरण करण्याचे सरकारच्या डोक्यात आहे. ओबीसीवरील अन्याय सरकारला दिसत नाही का? आता तेच सुप्रीम कोर्टाकडे बोट का दाखवतात. सुरक्षाकपात संदर्भात सरकारला आढावा येऊ द्या, मी त्या संदर्भात काही बोलणार नाही. एसटीची 50% दरवाढ करा, घोटाळे करा, दोन हजार कोटीचा घोटाळा झाला. त्याची चौकशी करा. हा फार मोठा घोटाळा आहे. एसटी तोट्यात, संकटात असताना पैसे खाणे, भ्रष्टाचार करणे, खात्याचे मंत्री आणि अधिकारी आहेत, ते सर्व त्यात दोषी आहे 15%अधिकारी यांनी दरवाढ करून, गरिबांना लुटून मोठ्याना वाटा देण्याचे काम आहे असा आरोपही केला.