Flight Delays Nagpur | मुंबईतील मुसळधार पावसाचा नागपुरातील मंत्री, आमदाराना फटका

मुंबईहून येणाऱ्या विमानांना विलंब झाल्यामुळे नागपूर विमानतळावर आमदार, नेते प्रतीक्षेत
Nagpur Airport News
नागपूर विमानतळFile Photo
Published on
Updated on

Mumbai Rain Flight Cancelled

नागपूर : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा आणि खराब हवामानाचा फटका नागपूरहून पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईला जाणाऱ्या मंत्री, आमदार, अधिकारी यांना गेले दोन दिवस बसला. मुंबईहून येणाऱ्या विमानांना मोठा विलंब झाल्यामुळे नागपूर विमानतळावर प्रतीक्षा केल्यानंतर अखेर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर आमदारांनी आपला मुंबई दौरा रद्द केला.आज ही मंडळी पुढे निघाली.

हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'नागपूर-मुंबई इंडिगोचे सकाळी १०.१० वाजताचे विमान मुंबईहून निघाले नाही. यामुळे मंत्री आणि आमदार विमानतळावर अडकून पडले.

Nagpur Airport News
Deekshabhoomi Nagpur | दीक्षाभूमीचा वाद; डॉ. राजेंद्र गवई, विलास गजघाटेंचे सदस्यत्व रद्द

भाजप आमदार प्रवीण दटके यांनीही पावसाच्या गोंधळामुळे मुंबईत जाणे रद्द केले. आपण पूर्वी एकदा तब्बल अकरा तास विमानात अडकून बसल्याचा अनुभव पुरेसा असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनीही मुंबईतून विमान उडालेच नसल्याने ते नागपुरात कधी येणार आणि परत कधी जाणार, हे अनिश्चित असल्याने दौरा उद्यावर ढकलला आहे.

या परिस्थितीमुळे अधिवेशनाचे कामकाज वाढवून द्यावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली असून, शेवटी हा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, असे सांगितले. खराब हवामानामुळे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विकास ठाकरे, समीर मेघे, प्रवीण दटके आणि डॉ. राजीव पोतदार यांना मुंबईला वेळेत पोहोचणे अशक्य झाल्याने विधिमंडळाच्या कामकाजाला या नेत्यांना मुकावे लागले आहे. हे सर्व नेते आता मंगळवारी मुंबईसाठी आपल्या सोयीने रवाना झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news