

Maharani Tarabai controversy
नागपूर : आम्ही जातीवादी नाही. आमच्यासाठी सर्वधर्म समभावचं! आहे, असे श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महावीर जयंतीदिनी जैन मुनी आचार्य नयन पद्मासागर यांनी महाराणी ताराबाई राणीसाहेब यांच्याबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह आहे.
ताराबाई राणीसाहेब यांचे वडील हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. त्या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा होत्या. त्या जैन नव्हत्या; मोहिते कन्या व भोंसलेच्या स्नुषा होत्या त्या मराठा होत्या. कृपया चुकीचा इतिहास पसरवू नका असेही राजे मुधोजी भोसले यांनी नमूद केले आहे.